Lokmat Health Tips | तुम्ही पूर्ण झोप घेत नाहीत ... मग हा Video पहाच | Lokmat Marathi News

2021-09-13 0

शरीराला आठ तासांच्या झोपेची आवश्कता असते. पण जर तुम्ही आठ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आठ तासांपेक्षा कमी झोप नैराश्येचे कारण ठरू शकते. नियमित आठ तासांपेक्षा कमी झोप झाल्याने नकारात्मक विचार वाढीस लागतात. झोप न झाल्यामुळे नकारात्मक विचार सतत तुमच्या डोक्यात फिरत राहतात आणि त्या विचारांपासून दूर जाणे कठीण होते. काही विचार लोकांच्या मनात अडकलेले असतात, त्यामुळे नकारात्मक उत्प्रेरकांपासून या विचारांना वेगळे करणे कठीण होते. नकारात्मक विचारांमुळे मानसिक विकार जडण्याचा धोका असतो. नैराश्य, एंग्जाइटी यासारखे विकार होऊ शकतात. हे संशोधन जर्नल साइस डायरेक्ट या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires